Breaking News

POSH Act-2013 ची राज्यभर काटेकोर अंमलबजावणी करा; नियमांचे उल्लंघन केल्यास ₹५० हजारांपर्यंत दंड

 

POSH Act-2013 ची राज्यभर काटेकोर अंमलबजावणी करा; नियमांचे उल्लंघन केल्यास ₹५० हजारांपर्यंत दंड


राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक तसेच खासगी आस्थापनांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ (POSH Act-2013) ची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी केले आहे.

१० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनात अंतर्गत तक्रार समिती (Internal Committee) स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे. ही समिती स्थापन न केल्यास अधिनियमाच्या कलम २६ नुसार संबंधित आस्थापनावर ₹५० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा दंड होऊनही समिती स्थापन न केल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना रद्द करणे अथवा दुप्पट दंडाची कारवाईही केली जाऊ शकते.

राज्यातील सर्व खासगी आस्थापनांनी SHE-Box Portal वर Private Head Office Registration द्वारे नोंदणी करून अंतर्गत समितीची माहिती अद्ययावत ठेवावी. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ झाल्यास संबंधित महिलांनी याच पोर्टलवरील 'Register Your Complaint' या पर्यायाद्वारे ऑनलाइन तक्रार दाखल करावी. तक्रार नोंदविण्यासाठी वैध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे.

याशिवाय, ज्या कार्यालयात किंवा आस्थापनात अंतर्गत समितीचा माहिती फलक दर्शनी भागात लावलेला नसेल, त्याबाबत महिलांनी महिला हेल्पलाईन १८१ वर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.