सिंधुदुर्गातील कथित बेकायदेशीर जमीन व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ले आदी भागांमध्ये सुरू असल्याची तक्रार असलेल्या कथित अवैध भूखंड खरेदी-विक्री आणि बेकायदेशीर प्लॉटिंग प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सखोल तपास करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
या संदर्भात मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कथित बेकायदेशीर जमीन व्यवहारांच्या चौकशीसाठी नियुक्त समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत अनधिकृत व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण, जमीन व्यवहारातील नियमांचे काटेकोर पालन, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे संरक्षण तसेच पारदर्शक आणि कायदेशीर व्यवहार सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे नितेश राणे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, रूबल अग्रवाल तसेच तृप्ती धोडमिसे सहभागी झाले.
सिंधुदुर्ग, जमीन व्यवहार, एसआयटी, महसूल विभाग, चंद्रशेखर बावनकुळे


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.