Breaking News

VB-G RAM G योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावती येथे निवासी प्रशिक्षण

अमरावती, दि. ४ :


या प्रशिक्षण कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा/पंचायत), गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हा एमआयएस समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत.

प्रशिक्षण कार्यक्रमाला विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) यांच्या आयुक्त श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.) यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय प्रक्रिया, नियोजन, समन्वय तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

या निवासी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करून ग्रामीण भागातील रोजगार व आजीविका हमी योजनांची अधिक परिणामकारक आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात येत असून, विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

#VBGRAMG

#रोजगारहमी

#ग्रामीणविकास

#महाराष्ट्रशासन

#AmravatiTraining

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.