अहिल्यानगर महापालिकेत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप!
१२ तक्रारी करूनही कारवाई नसल्याचा तक्रारदाराचा दावा; विधानसभा अध्यक्षांकडे धाव
अहिल्यानगर महानगरपालिकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक नुकसानीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार आर. एस. वखारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे निवेदन देत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून नुकसानाची वसुली करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
📌 महत्त्वाचे: तक्रारीतील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन ते सिद्ध झाल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. संबंधित प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध केली जाईल.
📰 आपलं सत्य अहिल्यानगर
सत्याच्या शोधात... बातमी विश्वासाची!
#आपलंसत्यअहिल्यानगर #अहिल्यानगर #अहिल्यानगरमहापालिका #आर्थिकगैरव्यवहार #महापालिका #उच्चस्तरीयचौकशी #आरएसवखारे #BreakingNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.