बैल पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांचा रूट मार्च
जामखेड : आगामी बैल पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात पोलिसांकडून रूट मार्च आणि जमाव विसर्जन सराव
जामखेड, दि. 9 सप्टेंबर 2026 : आगामी बैल पोळा आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामखेड पोलिसांनी बुधवारी शहरातून रूट मार्च काढला. मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
दुपारी 12.25 ते 1.35 या वेळेत जामखेड पोलीस स्टेशनपासून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बीड कॉर्नर, मेन पेठ, खर्डा चौक, तपनेश्वर रोड, नूरानी कॉलनी आणि सदाफुली वस्ती या मार्गावरून पोलिसांनी संचलन केले.
या रूट मार्चमध्ये जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, एपीआय अजित मोरे, पीएसआय किशोर गावडे, पीएसआय गणेश आघाव, पीएसआय खेडकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. खर्डा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील अधिकारी, डीआय आणि होमगार्ड यांचाही सहभाग होता.
रूट मार्चनंतर जामखेड बसस्थानक परिसरात जमाव विसर्जनाचा सराव घेण्यात आला. यावेळी डीआय अन्वर सय्यद यांच्या उपस्थितीत हा सराव पार पडला.
जमाव विसर्जनाच्या सरावादरम्यान आवश्यक पोलीस साहित्याचा वापर करण्यात आला. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून जामखेड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी येरप्पा काळे, नगरपरिषदेची अग्निशमन गाडी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांची उपस्थिती ठेवण्यात आली होती.
आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. रूट मार्च आणि जमाव विसर्जनाचा सराव दुपारी 1.35 वाजता शांततेत पूर्ण झाला.
जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे आपलं सत्य अहिल्यानगर सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.
जामखेड पोलीस, जामखेड बातम्या, बैल पोळा, गणेशोत्सव 2026, अहिल्यानगर

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.