Breaking News

महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

 



अहिल्यानगर | प्रतिनिधी : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

११ सप्टेंबरला नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१२ सप्टेंबरला राज्यातील अनेक भागांत हवामान खराब राहण्याची शक्यता असून, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

१३ सप्टेंबरला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१४ सप्टेंबरला नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असताना शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नये. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे

आपलं सत्य अहिल्यानगर — सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.


#अहिल्यानगर #हवामानअंदाज #यलोअलर्ट #महाराष्ट्रपाऊस #रवीकुमारशिंदे

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.