Breaking News

⚡ वीज अपघातातील भरपाईची माहिती नागरिकांना कार्यालयातच मिळावी!



अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरणच्या प्रत्येक विभाग, उपविभाग आणि शाखा कार्यालयाच्या दर्शनी भागात विद्युत अपघात भरपाईचा स्वतंत्र माहितीफलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

परिपत्रक क्र. ५३३नुसार जीवघेण्या विद्युत अपघातासाठी ₹४ लाखांच्या आर्थिक मदतीची तरतूद असल्याचे नमूद आहे. मात्र पात्रता, कागदपत्रे आणि दावा प्रक्रियेची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी कार्यालयांमध्ये स्पष्ट माहितीफलक असावा, अशी मागणी माहिती अधिकार नागरी समूहाचे जिल्हाध्यक्ष दिपक पाचपुते यांनी केली.




#महावितरण #विद्युतअपघात #भरपाई #अहिल्यानगर #माहितीअधिकार #पत्रकाररवीकुमारशिंदे

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.