अहिल्यानगरच्या शंकुतला नगरकर यांचे निधन; महाराष्ट्राच्या लावणी क्षेत्राची मोठी हानी
ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शंकुतला नगरकर यांचे निधन; अहिल्यानगरच्या कलाक्षेत्राची ज्येष्ठ पर्वणी संपली
पुणे, दि. २२ सप्टेंबर : ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शंकुतला नगरकर (वय
६६) यांचे मंगळवारी (२२ सप्टेंबर) कर्करोगाच्या आजाराने पुणे येथे निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने लावणी आणि महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.
शंकुतला नगरकर यांचे मूळ गाव अहिल्यानगर असून, त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ नगरमध्ये गेला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी घुंगरू बांधत लावणी क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी लावणी कलेची सेवा केली.
लावणी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना केंद्र सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तसेच शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार मिळाला होता. गेल्या वर्षी त्यांना राज्य सरकारचा कला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
शंकुतला नगरकर यांच्या कलाप्रवासाचा मोठा काळ पुणे, सोलापूर आणि बेळगाव या भागांत गेला. पारंपरिक लावणी कलेला आपल्या नृत्य आणि सादरीकरणातून त्यांनी वेगळी ओळख मिळवून दिली. पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर सक्रिय राहिलेल्या नगरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रातील एक अनुभवी कलाकार हरपला आहे.
जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे
#शंकुतला_नगरकर #लावणी #लावणी_नृत्यांगना #अहिल्यानगर #महाराष्ट्र_लोककला


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.