Breaking News

एसटीचे ‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाइन; आगारात जाण्याची गरज नाही

 



मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील ४ आणि ७ दिवसांचे पास आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने प्रक्रिया करण्याची आवश्यकता राहणार नाही.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ व ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने पास काढल्यानंतर तो प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात प्रवासावेळी दाखवता येणार आहे. ऑनलाइन मिळणाऱ्या पासवर QR कोड देण्यात येणार असून, प्रवासाच्या वेळी संबंधित QR कोड स्कॅन करून पासची पडताळणी केली जाईल.

या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच पास काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल होण्यास मदत होणार आहे.

#आवडेलतेथेप्रवास #STमहामंडळ #MSRTC #STPass #ऑनलाइनपास #महाराष्ट्रएसटी #प्रवासीसेवा #महाराष्ट्र

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.