Breaking News

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जामखेड तालुका सदस्यपदी रवीकुमार शिंदे यांची निवड

 


जामखेड | प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहक हक्कांसाठी कार्यरत संस्थेच्या जामखेड तालुका सदस्यपदी रवीकुमार शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहकांचे हक्क, जनजागृती आणि शोषणमुक्त समाजाच्या उद्देशाने कार्य करणारी संस्था आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार संस्थेची नोंदणी ऑल इंडिया रजिस्ट्रेशन क्रमांक S/9194, दिल्ली अशी असून संस्थेची स्थापना सप्टेंबर १९७४ मध्ये झाल्याची माहिती उपलब्ध आहे.

रवीकुमार शिंदे हे पत्रकारिता तसेच सामाजिक आणि जनहिताच्या विविध विषयांवर कार्यरत असून, ग्राहकांच्या समस्या, त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती आणि अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील नागरिकांना ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे अधिकार, तक्रार निवारण प्रक्रिया तसेच शासनाच्या संबंधित सुविधांबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी आगामी काळात उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

रवीकुमार शिंदे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

— प्रसिद्धीसाठी

रवीकुमार शिंदे

जामखेड तालुका सदस्य

अखिल भारतीय ग्राहक पंचायत

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.