Breaking News

फ्रोुटीतील संशयास्पद गाळ प्रकरणाची दखल; तुकाराम मुंढे यांच्या तत्परतेचे राजेश माकोडे यांनी केले कौतुक!

 


अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाची तत्परता; FDA अधिकाऱ्यांच्या कारवाईचेही केले कौतुक

मुंबई : D-Mart मधून खरेदी केलेल्या Parle Agro Pvt. Ltd. निर्मित FROOTI 2 लिटर रेडी-टू-सर्व्ह फ्रूट ड्रिंकमध्ये असामान्य गाळ, कण अथवा साचलेला पदार्थ आढळल्याची गंभीर तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने तपासणी व कारवाईची प्रक्रिया राबविल्याबद्दल राजेश मोहनलाल माकोडे यांनी माननीय श्री. तुकाराम मुंढे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

सदर उत्पादनामध्ये आढळलेल्या संशयास्पद पदार्थामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने तपासणी व पुढील कारवाई केली.

या संपूर्ण प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, जबाबदारी आणि कठोर भूमिका कौतुकास्पद असल्याचे राजेश माकोडे यांनी नमूद केले.

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको!

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निष्पक्ष तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधित उत्पादक व विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सत्य आणि जनहितासाठी केलेल्या प्रयत्नांना न्याय मिळाल्याचा आनंद असून, या प्रकरणात सहकार्य करून योग्य ती कारवाई करणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राजेश मोहनलाल माकोडे यांनी विशेष आभार मानले आहेत.

— राजेश मोहनलाल माकोडे

#आपलंसत्यअहिल्यानगर #अन्नसुरक्षा #FDA #ParleAgro #Frooti #ग्राहकहक्क #तुकाराममुंढे #राजेशमाकोडे

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.