Breaking News

धक्कादायक! अक्कलकोटमध्ये ट्रक पार्किंगला भीषण आग; ५ ते ६ ट्रक जळून खाक

 






अक्कलकोट : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी ट्रक पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत प्राथमिक माहितीनुसार तब्बल ५ ते ६ ट्रक जळून खाक झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक ट्रक पडले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या दुर्घटनेत झालेल्या आर्थिक नुकसानीचा अधिकृत तपशीलही समोर आलेला नाही.

या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि नुकसानीचा तपशील मिळाल्यानंतर पुढील अपडेट देण्यात येईल.

आपलं सत्य अहिल्यानगर | बातमी जनहिताची, भूमिका सत्याची!

#Akkalkot #SolapurNews #TruckFire #BreakingNews #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.