Breaking News

अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १,३६९ कोटींची कर्जमाफी जमा! आधार प्रमाणीकरणाला ९२.८६ टक्के प्रतिसाद; उर्वरित शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू

 

नगर | प्रतिनिधी


अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरणाकरिता प्राप्त झालेल्या एकूण १ लाख ५८ हजार १८८ शेतकऱ्यांपैकी १ लाख ४६ हजार ८९३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. याचे प्रमाण ९२.८६ टक्के इतके आहे.


दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ लाख ४३ हजार २९३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर १ हजार ३६९ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.


यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख २४ हजार २८६ शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १५८ कोटी ७१ लाख रुपये जमा झाले आहेत. तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या १९ हजार ७ शेतकऱ्यांच्या खात्यांवर २१० कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.


एकूणच, अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


आपलं सत्य अहिल्यानगर

संपादक : रवी कुमार शिंदे

#Ahilyanagar #Karjmafi #FarmerLoanWaiver #MaharashtraFarmers #AadhaarAuthentication #शेतकरी #कर्जमाफी #अहिल्यानगर #शेतकरीबातम्या #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.