आमदार सत्यजीत तांबे यांचा विद्यार्थ्यांशी
संवाद; शैक्षणिक सुविधांचा घेतला आढावा!
वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन; पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांच्या कार्याचे विशेष कौतुक
राजूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मवेशी परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेट देत शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेतला.
या दौऱ्यात त्यांनी श्री समर्थ विद्यालय, राजूर प्राथमिक शाळा तसेच मवेशी येथील शैक्षणिक संकुलाला भेट दिली. यावेळी शाळेतील वसतिगृह, शालेय इमारती, भोजन हॉल आणि सेंट्रल किचनची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली.
तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक कामकाजातील समस्या जाणून घेतल्या. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कामकाजाची माहिती घेऊन संबंधित संस्थांच्या गरजांचाही आढावा घेतला.
शैक्षणिक संस्थांचा विकास करताना विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक परिसर उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान शैक्षणिक संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, परिसर स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांवरही चर्चा झाली. शैक्षणिक संस्थांनी पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, मवेशी परिसरात पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांच्या कार्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास परिसराच्या पर्यावरणीय समृद्धीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या चांगल्या कार्यात आपण नेहमी सोबत असल्याची ग्वाहीही दिली.
पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य
#सत्यजीततांबे #मवेशी #राजूर #शिक्षण #पर्यावरणसंवर्धन


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.