पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य
५६ लाख शेतकऱ्यांना ₹३६,५०० कोटींचा लाभ; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून थेट खात्यात रक्कम जमा होणार
अहिल्यानगर | दि. ३० जून : राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद व आधार प्रमाणीकरण (e-KYC) संबंधित बँक शाखेत तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना एकूण ₹३६,५०० कोटींची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून प्रत्येक कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर स्वतंत्र कर्ज खाते क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि शासकीय पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी विलंब न करता आपल्या संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून योजनेचा लाभ वेळेत मिळू शकेल, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.