Breaking News

खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता; मुठा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 🚨 अत्यंत महत्त्वाची सतर्कता सूचना 🚨


🌊 मुठा नदीकाठावरील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.


परिस्थितीचा आढावा घेता खडकवासला धरणातून विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सुमारे ४५,००० क्युसेक्सपर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे.


⚠️ नागरिकांनी तात्काळ पुढील खबरदारी घ्यावी :

✅ मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठी जाऊ नये.

✅ नदीपात्रातील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, वाहने, जनावरे व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे.

✅ नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

✅ कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच अवलंबून राहावे.


📢 संबंधित सर्व विभागप्रमुख महानगरपालिका, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासन यांनी आपल्या स्तरावर नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.


–आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.