भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अहिल्यानगर, दि. २३ भंडारदरा धरणातून आज दुपारी ३.३० वाजता प्रवरा नदीपात्रात १,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून, पावसाचे प्रमाण लक्षात घेता या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले आहे.
प्रवरा नदीकाठच्या अकोले, संगमनेर व ओझर बंधाऱ्याखालील राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनीही योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
#भंडारदराधरण #BhandardaraDam #अहिल्यानगर #Ahilyanagar #प्रवरानदी #PravaraRiver #पाण्याचाविसर्ग #DamDischarge #सतर्कतेचाआवाहन

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.