Breaking News

दहीहंडी उत्सवातील १.६० लाख गोविंदांना शासनाकडून विमा संरक्षण

 


मुंबई, दि. ७ : दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने यंदा मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या सहभागाचा विचार करून यावर्षी १ लाख ६० हजार गोविंदांना शासनामार्फत विमा संरक्षण देण्यात येणार असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


दरवर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन विमा संरक्षणाची योजना राबविते. यंदा गोविंदापथकांची वाढती संख्या पाहता विमा संरक्षणाच्या कक्षेत आणखी अधिक गोविंदांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील गोविंदांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे.


शासन निर्णय:

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202608061544145142.pdf

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.