Breaking News

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 'घरोघरी तिरंगा' अभियानांतर्गत विशेष प्रभात फेरी

 


मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन आणि 'घरोघरी तिरंगा' अभियान निमित्त विशेष प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही प्रभात फेरी रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ९.३० या वेळेत भारतीय विद्या भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई या मार्गावर आयोजित करण्यात आली आहे.

या प्रभात फेरीत नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्तीचा संदेश अधिक व्यापक करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

#घरोघरीतिरंगा
#हरघरतिरंगा
#HarGharTiranga2026


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.