Breaking News

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार


व कोयत्याने हल्ला; तरुणाची प्रकृती चिंताजनक

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी भरदिवसा गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. जीव वाचवण्यासाठी तरुणाने न्यायालयाच्या परिसरात धाव घेतली; मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत धारदार कोयत्याने हल्ला केला. बचाव करण्याच्या प्रयत्नात तरुणाच्या हातांवर गंभीर दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमी तरुणाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पुरावे संकलन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

न्यायालयासारख्या अत्यंत संवेदनशील परिसरात हिंसक घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायासाठी न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागील कारण आणि आरोपींची ओळख तपासातून स्पष्ट होणार आहे.

न्यायालयाच्या परिसरातच नागरिक सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करायची? हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य

#पुणे #शिवाजीनगर #पुणेक्राईम #गोळीबार #आपलंसत्यअहिल्यानगर

पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.